ऑनलाइन पत्रकारितेमध्ये पत्रकार म्हणून कोणती काळजी घ्यावी लागते ? व वेब संपादकाची कार्य कोणती ?

ऑनलाइन पत्रकारितेमध्ये पत्रकार म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी लागते.

1.  शब्दसंख्या – वाचक हे मोबाईल किंवा संगणकावर बातम्या वाचत असतात किंवा पाहत असतात.  वाचक किंवा श्रोता हा कमी वेळामध्ये खूप साऱ्या बातम्या पाहत असतो त्यामुळे पत्रकाराने  शब्दसंख्या  तिचा विचार करणे गरजेचे असते. कमी शब्दांमध्ये श्रोत्यात वाचकास बातमी संपूर्ण समजावी असे असते.  त्यामुळे शब्दसंख्या ही मर्यादित असावी.

2. छोटी वाक्य- ऑनलाइनच्या माध्यमातून वाचक कमी वेळात खुप सारे काम करत असतो. त्यामुळे त्याच्याकडे वेळ हा ही तितकाच कमी असतो. पत्रकार यांनी  विचारकरून बातमी लिहिताना छोट्या वाक्यांचा वापर करणे गरजेचे आहे.

3. सोपी भाषा- शब्दसंख्या,  छोटी वाक्य तसेच सोपी भाषा ही ही खूप महत्त्वाचे आहे.  वाचक श्रोता हा कमी वेळामध्ये खूप साऱ्या बातम्या वाचत असतोअसतो.  त्यामुळे त्याला भाषण ही अवघड न वाटता सोपी व समजेल अशी असल्यास बातमी  संपूर्ण वाचली जाते.

4. वाचकाच्या दृष्टिकोनाला महत्त्व-   इंटरनेट वापर करणारा हा उच्चशिक्षित व तंत्रज्ञानाचे व ऑनलाइन बाबत ओळख असणारा असतो. त्यामुळे वाचक सुज्ञ असल्याने बातमी ही  वाचकाच्या दृष्टिकोनातून असावी. तसेच बातमी हे वृत्तपत्र संस्था किंवा वृत्तपत्रांमध्ये ज्या पद्धतीने लिहिली जाते तशी ऑनलाइन पत्रकारितेमध्ये लिहिली जात नाही. वाचकाच्या दृष्टिकोनाला महत्त्व दिले जाते.

5. लक्षवेधी हेडलाईन- वाचकाला आवडणारी व प्रभावित करणारी हेडलाईन्स आकर्षित करते.  त्यामुळे लक्षवेधी हेडलाईन असणे आवश्यक आहे.  त्यामुळे सदर बातमी वाचली जाते.

6. बातमी संपल्यानंतर  विविध बातम्यांचे लिंक- पत्रकार ही त्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्याखाली विविध इतर बातम्यांच्या लिंक शेअर करत असतो. जेणेकरून त्याने त्या पोर्टलवर जास्त वेळ वावर करावा. म्हणून असे होत असल्याने विविध बातम्या वाचल्या जातात व वेब पोर्टल वरती वाचक हा स्थिरावतो.

7. पहिला पॅरेग्राफ महत्त्वपूर्ण-  पत्रकारितेमध्ये पहिला पॅरेग्राफ हा महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे ऑनलाइन पत्रकारितेमध्ये ही पहिल्या पॅरेग्राफ ला महत्त्व आहे. साधारणता ऑनलाइन बातमीमध्ये पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तिन पेक्षा जास्त वाक्य नसतात.

8. रंगसंगती-  बातमी मध्ये रंगसंगती उत्तम असल्याने वाचकास पसंत पडते. त्याच बरोबर वेबसाइट/ वेब पोर्टलचा लोगो हा ही तितकाच महत्त्वाचा ठरतो.

9. उत्तम फॉन्ट चा वापर- फॉन्ट चा वापर हा चांगला व आकर्षक असल्यास वाचक हा बातमी वाचत असतो. बातमी च्या फॉन्ट वरून बातमी ज्यास्त वाचली जाते. त्याचप्रमाणे विशिष्ट ठिकाणी बोल्ड व कलर्स चा वापर केल्याने बातमी वाचकास प्रभावीत करते.

वेब संपादकाची कार्य- वेब संपादक वेब पोर्टल तसेच वेबसाईट यांच्यावरती लिखित होणाऱ्या बातम्या पुनर्लेखन व्याकरण व इतर सर्व बाबी त विचार करून वेब पोर्टलवर बातमी प्रसारित करीत असतो.  तसेच बातमीही सामाजिक तेढ निर्माण  करणारी आहे का?  हे पाहून बातमी प्रसारित करतो.

1.  बातमीच्या चुका दुरुस्ती करणे- ऑनलाइन पत्रकार ही बातमी संपादकास मिळाल्यानंतर त्यावर संस्कार करतो.  त्या बातमी मधील चुका दुरुस्त करतो.  बातमी पुनर्लिखित करतो. बातमी योग्य पद्धतीने व सोप्या शब्दात लिखित करतो.

2.   बातमीची सत्यता पडताळणी- पत्रकाराने बातमी पाठवल्यानंतर त्या बातमीचे पडताळणी करत असतो. त्या बातमीचे सत्य-असत्य पडताळत असतो. त्याचप्रमाणे ती बातमी योग्य का? हे पाहत असतो.  बातमी सामाजिक तेढ निर्माण करणारी असल्यास ती प्रसारित करीत नाही.

3. आकडेवारी तपासणी- विविध वर लिखाण करत असताना. आर्थिक किंवा आकडेमोड केली जाते. त्याकडे मोड योग्य आहे का? ह्याची शहानिषा करण्याचे काम संपादक करत असतो. त्यामुळे आकडेवारी चुकू नये व त्याचा परिणाम हा चुकीचा होऊ नये म्हणून आकडेवारी तपासण्याचे काम संपादक करतो.

4. बातमीचा सोर्स-  पत्रकार हा बातमी वेब पोर्टल ला पाठवल्यानंतर त्याचे काम संपते परंतु वेब संपादक ती बातमी योग्य आहे का? पडताळणी करत असतो.  तो विविध सोर्स वापरून बातमीची सत्यता पडताळणी करत असतो.  व बातमी ही योग्यरीत्या पुनर्लिखित करतो.  विविध व्यक्ती, संस्था, परिचित पत्रकार यांच्याकडून त्या बातमीसंदर्भात माहिती गोळा करून बातमी उत्तम तयार करून  प्रसारित करतो.

5. पोर्टल ची  शैली-  बेब पोर्टल ची शैली एक विशिष्ट प्रकारची असते.  त्या पद्धतीमध्येच  पोर्टल हे बातम्या प्रसारित करत असते.  कोणत्या शब्द असावेत कोणते शब्दां नसावेत ह्याबाबत  काळजी घेतली जाते.  तसेच वेब पोर्टलवर बातमी व त्यावरील फोटो हे योग्य आहे का? याचाही प्रामुख्याने विचार केला जातो. बहुतांशी वेब पोर्टल हे वृत्तसंस्थेचे मालकीचे असते.  त्याची शैली ही जपली जाते.

6. शब्दमर्यादेचे पालन- वाचता कमी वेळात जास्त बातम्या वाचत असतो. त्यामुळे शब्दसंख्या तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचे मुख्य काम संपादक करत असतो. साधारणपणे 150  शब्दांपर्यंत बातमी असते.  बातमीचे विविध भाग  करून त्यास वेगवेगळे हेडलाईन देऊन बातमी वाचकांपर्यंत पोचवतो.

7. कन्टेन्ट- बातमीही थोडक्यात असली तरी तिचा कन्टेन्ट हा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे बातमी चा प्रभाव हा वाचका वरती पाडला जाऊ शकतो. असे असल्याने बातमी चा हा महत्वाचा भाग समजून त्यावर वेब संपादक त्याचे काम करत असतो.

वरील प्रमाणे वेब संपादक त्याचे कार्य करत असतो.