
आपण जीवनाचा प्रवास करत असताना किती बदल होत आहेत. हे पाहतो किती तरी नवीन गोष्टी येतात आणि किती तरी जुन्या गोष्टी आपल्या समोर पुढे नव्याने उभ्या राहतात. त्या मध्ये कपड्यांच्या रचना, केसांची रचना किंवा विविध व्यसन करण्याची पद्धत. कपडे किंवा इतर विषय समजू शकतो, पण व्यसन करण्याची पद्धत हे थोडे चुकीचे वाटते ना? पण हे खरे आहे. नव्याने पुन्हा आपल्यात सहभागी झाला तो म्हणजे हुक्का.
या घडीला व्यसन करण्याचे वेगवेगळे प्रयोग आपल्यापुढे येत आहे. जुने ते सोने असे म्हणत हुक्का आपल्यासमोर आहे. आणि त्यात नवीन पिढी ही हे काही नवीन आहे. म्हणून त्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. काही राजा – महाराज (छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांना सोडून) यांच्या बऱ्याच चित्रांमधून, चित्रपटामधून आपल्यापुढे हुक्का येतो. त्यामुळे त्याला राजाश्रय व श्रीमंतीचे प्रतीक असा गोड भास होतो. त्याचा फायदा हॉटेल व्यवसायिक किंवा हुक्का पार्लर यांनी करून घेतला. व नव्या पिढीला नवीन व्यसना चा मार्ग दिला.
किती तरी मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर पुणे आणि परिसरामध्ये सुरू आहे. हे आपण पाहतो आहे. काही ठिकाणी पोलीस अधिकारी किंवा माझी सदनी अधिकारी यांची भागीदारी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हुक्का पार्लर बिनधास्तपणे सुरू केले आहे. असेच म्हणावे लागेल.
शाळा किंवा कॉलेजची मुले-मुली यांना याचे फार आकर्षण असल्याचे दिसते. त्यांना कल्पना नाही की ते नक्की कोणत्या दिशेने चालले आहेत. पुण्यामध्ये शिक्षणासाठी दुसऱ्या गावातून, शहरांमधून, इतर राज्यांमधून नव्हे नव्हे परदेशातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत ते यासाठी बळी पडत आहे. तसेच येथील युवक सुद्धा या मध्ये सामील होताना दिसत आहेत. आयटी मधील बक्कळ पगार घेऊन किंवा वडिलोपार्जित जमिनी विकून आयुष-आरामात आणि विविध व्यसने करण्यास भरपूर वेळ व भरपूर पैसा असे काही झाल्याने बिनधास्तपणे चालले आहे. परंतु या गोष्टीचा भविष्य काय परिणाम होईल याचे विवेचन न चिंता कोणी करत नाही हे मात्र खरे.
हॉटेल व्यवसायिक किंवा हुक्का पार्लर व्यवसायिक यांना नवीन पिढीचे काही देणे घेणे नाही, असे म्हणावे लागेल. त्यांना हुक्क्या मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा दिसत असल्याने तसेच कोणी अधिकारी भागीदार असल्याने व्यवसाय मुक्तपणे व बिनदिक्कतपणे सुरू केले आहे. या पैशातून मोठ्या गाड्या, बंगले, परदेशी वाऱ्या, सदस्य ते सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधील पदे मिळविण्यासाठी मुबलक पैसा उभा राहत आहे. तो ही अतिजलद पण त्याचा समाजावर काय परिणाम होत आहे. तसेच त्याच्या स्वतःच्या परिवारावर काय परिणाम होत आहे. याचा विचार जरासुद्धा हे व्यवसायिक करत नाही.
‘जे पेरले तेच आणि तेच उगवते’ या उक्तीप्रमाणे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी कोणत्या प्रकारचा व्यवसाय करून पैसे जमा केले आहे व त्याचा वापर पुढची पिढी कशी करेल हे समजून घेतला तर मोठा अनर्थ टाळू शकतो.
‘निसर्गाचा नियम कोणासाठी बदलत नाही’ हे वाक्य लक्षात ठेवण्यासारखे आहे.
गुजरात राज्यानंतर महाराष्ट्रामध्ये सिगारेट आणि तंबाखू उत्पादनात संदर्भीय अधिनियम 2003 नुसार हुक्का बंदी घातली आहे. म्हणजे भारत देशातील महाराष्ट्र हे राज्य या बाबतीत निर्णय घेणारे दोन नंबरचे राज्य म्हणावे लागेल. पण सर्वोच्च न्यायालयाने असे म्हंटले की सिगारेट आणि तंबाखू उत्पादन अधिनियम या मध्ये हुक्क्याचा किंवा अशा वाक्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने हुक्का पार्लर बंदी घालता येणार नाही. याचा गैरफायदा घेऊन राजरोसपणे हुक्का पार्लर सुरू आहे.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून हुक्का या विषयावर आपली भूमिका काय आहे. राजरोसपणे उघड्या डोळ्याने हे पहात राहायचे का? युवा अवस्थेत नव्याने प्रवेश करणारी मुले मुली या व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यात काही दिवसांनी आपली मुले दिसतील त्यावेळेस आपला आपल्याला धक्का बसू नये एवढे झाले म्हणजे जीवन सार्थक म्हणावे लागेल. यासाठी सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. तसेच सर्वांनी पुढाकार घ्यावा लागेल.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आपण ऐकले असेल, चित्रपटामध्ये पाहिले असेल किंवा चित्र वाहिनी मध्ये मालिकांमधून आपण त्यांना व त्यांच्या जीवन प्रवास पाहत आलो आहे. यामध्ये कधी चुकूनही चुकीचे प्रसंग पाहण्यात व वाचनात आले नाही. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न पडणे गरजेचे आहे. आपण या महान व्यक्तींच्या सहवासात असताना असे काही पाहिले नाही. ना वाचले मंग आपण शिवरायांचे मावळे हे कसे पाहू शकतो. त्यासाठी छत्रपतींचे स्मरण करून अशा कृत्यांचा विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे. व समाज जागृत करणे हा उद्देश असावा.