तरुण पिढी आणि हुक्का

आपण जीवनाचा प्रवास करत असताना किती बदल होत आहेत. हे पाहतो किती तरी नवीन गोष्टी येतात आणि किती तरी जुन्या गोष्टी आपल्या समोर पुढे नव्याने उभ्या राहतात. त्या मध्ये कपड्यांच्या रचना, केसांची रचना किंवा विविध व्यसन करण्याची पद्धत. कपडे किंवा इतर विषय समजू शकतो, पण व्यसन करण्याची पद्धत हे थोडे चुकीचे वाटते ना? पण हे खरे आहे. नव्याने पुन्हा आपल्यात सहभागी झाला तो म्हणजे हुक्का.

या घडीला व्यसन करण्याचे वेगवेगळे प्रयोग आपल्यापुढे येत आहे. जुने ते सोने असे म्हणत हुक्का आपल्यासमोर आहे. आणि त्यात नवीन पिढी ही हे काही नवीन आहे. म्हणून त्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. काही राजा – महाराज (छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांना सोडून) यांच्या बऱ्याच चित्रांमधून, चित्रपटामधून आपल्यापुढे हुक्का येतो. त्यामुळे त्याला राजाश्रय व श्रीमंतीचे प्रतीक असा गोड भास होतो. त्याचा फायदा  हॉटेल व्यवसायिक किंवा हुक्का पार्लर यांनी करून घेतला. व नव्या पिढीला नवीन व्यसना चा मार्ग दिला.

किती तरी मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर पुणे आणि परिसरामध्ये सुरू आहे. हे आपण पाहतो आहे. काही ठिकाणी पोलीस अधिकारी किंवा माझी सदनी अधिकारी यांची भागीदारी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हुक्का पार्लर बिनधास्तपणे सुरू केले आहे. असेच म्हणावे लागेल.

शाळा किंवा कॉलेजची मुले-मुली यांना याचे फार आकर्षण असल्याचे दिसते. त्यांना कल्पना नाही की ते नक्की कोणत्या दिशेने चालले आहेत. पुण्यामध्ये शिक्षणासाठी दुसऱ्या गावातून, शहरांमधून, इतर राज्यांमधून नव्हे नव्हे परदेशातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत ते यासाठी बळी पडत आहे. तसेच येथील युवक सुद्धा या मध्ये सामील होताना दिसत आहेत. आयटी मधील बक्कळ पगार घेऊन किंवा वडिलोपार्जित जमिनी विकून आयुष-आरामात आणि विविध व्यसने करण्यास भरपूर वेळ व भरपूर पैसा असे काही झाल्याने बिनधास्तपणे चालले आहे. परंतु या गोष्टीचा भविष्य काय परिणाम होईल याचे विवेचन न चिंता कोणी करत नाही हे मात्र खरे.

हॉटेल व्यवसायिक किंवा हुक्का पार्लर व्यवसायिक यांना नवीन पिढीचे काही देणे घेणे नाही, असे म्हणावे लागेल. त्यांना हुक्क्या मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा दिसत असल्याने तसेच कोणी अधिकारी भागीदार असल्याने व्यवसाय मुक्तपणे व  बिनदिक्कतपणे सुरू केले आहे. या पैशातून मोठ्या गाड्या, बंगले, परदेशी वाऱ्या, सदस्य ते सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधील पदे मिळविण्यासाठी मुबलक पैसा उभा राहत आहे. तो ही अतिजलद पण त्याचा समाजावर काय परिणाम होत आहे. तसेच त्याच्या स्वतःच्या परिवारावर काय परिणाम होत आहे. याचा विचार जरासुद्धा हे व्यवसायिक करत नाही.

‘जे पेरले तेच आणि तेच उगवते’ या उक्तीप्रमाणे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी कोणत्या प्रकारचा व्यवसाय करून पैसे जमा केले आहे व त्याचा वापर पुढची पिढी कशी करेल हे समजून घेतला तर मोठा अनर्थ टाळू शकतो.

‘निसर्गाचा नियम कोणासाठी बदलत नाही’ हे वाक्य लक्षात ठेवण्यासारखे आहे.

गुजरात राज्यानंतर महाराष्ट्रामध्ये सिगारेट आणि तंबाखू उत्पादनात संदर्भीय अधिनियम 2003 नुसार हुक्का बंदी घातली आहे. म्हणजे भारत देशातील महाराष्ट्र हे राज्य या बाबतीत निर्णय घेणारे दोन नंबरचे राज्य म्हणावे लागेल. पण सर्वोच्च न्यायालयाने असे म्हंटले की सिगारेट आणि तंबाखू उत्पादन अधिनियम या मध्ये हुक्क्याचा किंवा अशा वाक्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने हुक्का पार्लर बंदी घालता येणार नाही. याचा गैरफायदा घेऊन राजरोसपणे हुक्का पार्लर सुरू आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून हुक्का या विषयावर आपली भूमिका काय आहे. राजरोसपणे उघड्या डोळ्याने हे पहात राहायचे का? युवा अवस्थेत नव्याने प्रवेश करणारी मुले मुली या व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यात काही दिवसांनी आपली मुले दिसतील त्यावेळेस आपला आपल्याला धक्का बसू नये एवढे झाले म्हणजे जीवन सार्थक म्हणावे लागेल. यासाठी  सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. तसेच सर्वांनी पुढाकार घ्यावा लागेल.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आपण ऐकले असेल, चित्रपटामध्ये पाहिले असेल किंवा चित्र वाहिनी मध्ये मालिकांमधून आपण त्यांना व त्यांच्या जीवन प्रवास पाहत आलो आहे. यामध्ये कधी चुकूनही चुकीचे प्रसंग पाहण्यात व वाचनात आले नाही. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न पडणे गरजेचे आहे. आपण या महान व्यक्तींच्या सहवासात असताना असे काही पाहिले नाही. ना वाचले मंग आपण शिवरायांचे मावळे हे कसे पाहू शकतो. त्यासाठी छत्रपतींचे स्मरण करून अशा कृत्यांचा विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे. व समाज जागृत करणे हा उद्देश असावा.

लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन नवमाध्यमांवर करताना कोणती काळजी घ्यावी? लोकसभा निवडणुकीची एखादी बातमी तयार करा.

निवडणूका होत असताना नवमाध्यमांतील उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. माध्यमे ही  प्रचार करणारी यंत्रणा म्हणून पुढे येत असल्याचे दिसून येते, त्यामुळे माध्यमांना विविध प्रकारचे दबाव येतात. माध्यमांवर विविध प्रकारच्या राजकीय समीकरणे  जुळवण्यासाठी जाहिराती प्रसारित करत असता. त्यामुळे माध्यमांना उत्पन्न मिळत आहे. असे असल्याने लोकसभा निवडणुकांमध्ये विशिष्ट पक्षाचा किंवा व्यक्तीचा अजेंडा राबवताना माध्यमे दिसतात आहे. असे असल्याने लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन करताना नैतिक मुल्यांचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे.
              

               ज्या प्रमाणे माध्यमे आत्तापर्यंत कामे करत होती त्याचप्रमाणे नवमाध्यमे ही लोकसभा निवडणुकीच्या काळात कामे करताना दिसत आहे.  बदलणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक व ऑनलाइन माध्यमातून वाचकांचे प्रमाण मोठे आहे, त्यामुळे नव माध्यमांना निवडणुकीच्या काळात विविध प्रकारची बंधने  व बातमीचे होणारा परिणाम हा लक्षात घेऊन बातमी द्यावी लागते किवा करावी लागते.

नवमाध्यमांना खालील प्रमाणे काळजी घ्यावी लागते.

१. बातमी हि निरपेक्ष असावी.

२. जाती – धर्म यांचा विचार करून बातमीची भूमिका असावी. सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

३. आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता बातमी असावी.

४. पक्षाच्या विचारणा किवा एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाला बळी न पडता बातमी असावी.

५. सत्य परिस्थिती दर्शवणारी  बातमी असावी.

६. ऐकीव माहितीवर बातमी नसावी, सत्यता पडताळून किवा प्रत्यक्ष झालेल्या घटनेवर बातमी असावी.

७. बातमीचे तथ्य जाणून घेऊन बातमी करावी.

८. आरोप-प्रत्यारोप ह्याची माहिती घेऊन बातमी असावी,खरच एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती वर आरोप केले आहेत का ह्याची तपासणी करून बातमी तयार करावी.

९. व्यक्ती किवा नेत्याच्या उमेदवाराच्या वैयक्तिक जीवनावर प्रभावित असणारी बातमी नसावी. खाजगी जीवनावर प्रभाव पडेल किवा चुकीची माहिती प्रसारित होईल ह्याची काळजी घ्यावी

१०. बातमी-दारी करताना नेता किवा उमेदवार त्याचा प्रचार करण्यासाठी बातमीचा उपयोग करून घेत आहेका याचा विचार करणे गरजेचे आहे.

११.आर्थिक देण्या-घेण्यावरून किवा प्रेम पोटी बातमी नसावी.

१२.बातमी मध्ये सर्वच आदर असावा उगाच कोणा व्यक्तीला किवा पक्षाला जुकते माप देऊ नये.

१३. बातमी मध्ये कोणाचा प्रचार नसावा किवा प्रपोगंडा चालू नये किवा बळी पडू नये.

१४. एखद्या उमेदवरचा उगाच वाहवाह नसावी किवा दैनदिन बाबीनाचा उहापोह टाळावा .

१५. बातमीची चव वाढावी म्हणून मिट-मिरची लाऊन बातमी नसावी जे असेन ते स्पष्ट आणि सोप्या भाषेत असावे.

१६. बातमी ही निरपेक्ष, निरव्याक्ती, निपक्षी व समजासाठी दिशा व सत्य व प्रामाणिक असावी.

ह्या प्रमाणे लोकसभेचे वार्तांकन करताना नवमाध्यमांनी काळजी घ्यावी.

बातमी
  

बारामती कोणाची ?

पिरंगुट ता. २९ : बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान २३ एप्रिल झाले,परंतु प्रचार इतकी चर्चा बारामती कोणाची या विषयाची झाली. कमी झालेले मतदान, जोरदार प्रचार, नेते व त्याच्या वल्गना या मुळे कोणाचा विजय होईल या विषयी उत्सुकता बारामती मतदार संघात आहे.

भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा प्रबळ उमेदवार दिल्याने मोठे आव्हान राष्ट्रवादी पुढे निर्माण झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी च्या उमेदवार या पूर्वी दोन वेळा प्रचंड मतांनी विजयी झाल्या होत्या. सन. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असून सुद्धा त्यांनी विजय संपादन केला होता. तसेच अजित पवार व  धनंजय मुंडे यांच्या मोठ्या सभा झाल्या व प्रत्यक्ष अजित पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना दूरध्वनी वरून संपर्क केल्याने कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून आले. तसा हा मतदार संघ शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. त्या मुळे येथील निवडणूक हि तेवढी प्रतिष्ठेची झाली.असे या वेळी दिसून आले.

भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा स्थानिक असणाऱ्या कांचन कुल यांना उमेदवारी दिली. या मतदार संघासाठी पक्षाच्या दिग्गज व्यक्ती यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली. मंत्री चंद्रकांत पाटील हे या मतदार संघात तळ ठोकून होते. संघ कार्यकर्त्यांनी १०० % प्रचारात सहभाग घेतला. तसेच नरेंद्र मोदी, अमित शहा, उद्धव ठाकरे व देवेन्द्र फडणवीस यांनी पुणे व  बारामती परिसरात मोठ्या सभा घेतल्या. याचा परिणाम हा मतावर होताना दिसला पक्षाचे कार्यकर्ते व संघ कार्यकर्ते १०० % मतदान होण्या साठी व त्या अनुषंगाने भाजपा चा प्रचार केला. परंतु मतदान हे कमी झाल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून आले.

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोर हे विधानसभा येतात या मध्ये पक्षाची ताकद हि बरोबरीची आहे असे जाणकारांचे मत आहे. बारामती, इंदापूर व भोर हे राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्या कडे आहे. खडकवासला, पुरंदर व दौंड भाजपा, शिवसेना व रसपा  यांच्या कडे आहे. त्या मुळे हि लढत तुल्यबळ आहे. त्याचा प्रमाणे भोरचे आमदार व इंदापूरचे मा.आमदार हे कॉंग्रेस चे असल्याने त्यांनी नक्की काय भूमिका घेतली ह्या विषयी गुड निर्माण झाल्याने लढती मध्ये कोण विजयी होईल हा प्रश्न दोनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतावतो आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा एक हि उमेदवार नसताना पुणे परिसरात राज ठाकरे यांनी मोदी व शहा यांच्या विरोधात घेतलेली सभा हि महत्वाची घटना मानली जाते. मनसे यांचे या मतदार संघात युवक संघटन व मतदार संख्या मोठी आहे. त्या मुळे राष्ट्रवादी ला जमेची बाजू झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

बारामती लोकसभा मतदार संघ हा नक्की कोणाकडे राहतो आहे हे येणाऱ्या २३ मे ला समजेन परंतु हि निवडणूक राष्ट्रवादी पक्षाला प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरली.