एक आधारवड – सौ. प्रतिभा केंजळे मॅडम व केंजळे सर

संस्कार प्रतिष्ठान

मतिमंद मुलाची निवासी शाळा, पिरंगुट- अंडवेट

सामाजिक क्षेत्रात खूप मोठी मोठी माणसे काम करत आहेत. आणि सामाजिक दायित्व निभावत आहे त्या मध्ये प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ, अभय बंग, मोहन धारिया, अण्णा हजारे, पोपटराव पवार, मेधा पाटकर, विनोबा भावे, कै. गोविंद पानसरे डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रतिभा केंजळ व ईतर ही खूप महत्वाच्या व्यक्तीनी आपले योगदान या क्षेत्रात दिले त्यांच्या शिवाय हा सूज्ञ समाज निर्माण होऊ शकल्या नसता. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आणि क्षेत्र ही आगदी वेगळे पण प्रामाणिक पणे समजाची सेवा हा मुख्य उद्देश या सर्वांपुढे आहे आणि असतो या सर्वांना कोठून ऐवडी शमता आणि उत्साह मिळतो हे समजत नाही हे कबूल केले पाहिजे.. कदाचित या सारखी व्यक्ती देवच वाटते.

    मी या सर्व व्यक्ती च्यां बद्दल काय काय लिहावे असे होते पण माझा अभ्यास निच्छित कमीच पडेल हे मात्र नक्की पण म्हणून मी माझ्या समोर असणाऱ्या आणि त्यांचा प्रवास काही वर्ष तरी मी पाहिलं अश्या केंजळे परिवार विषयी लिहण्याची ठरवले त्या साठी 2013 सालच्या लोकमत मधील लेखाचा असरा घ्यावा लागला परंतु त्या ही पलीकडले म्हणजे त्यांना मी प्रत्यक्ष पाहिले असल्याने मला त्यांच्या त्याग आणि अपार कष्ट डोळ्या समोर उभे राहते म्हणून हा लेख लिहण्यासाठी घेतला.   

        केंजळेसर परिवार पिरंगुट मध्ये राहण्यास आले सर शिक्षक होते. त्यामुळे ते आले असावेत त्यावेळी शिक्षक हे ज्या शाळेत शिकवत त्या भागात राहत असे. त्या कारणाने ते स्थाईक झाले असे म्हणण्यास काही हरकत नाही. त्यांना एक मतिमंद मुलगा होता. त्याच्या शिक्षणासाठी परत पुण्यात जाणे शक्य नव्हते आणि पुण्यात  फक्त 'कामायनी' शाळा होती. जी मतिमंद मुलांना शिकवत होती. पण हा रोजचा प्रवास शक्य नव्हतं आणि त्या वेळी प्रवास करण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा सरकारी एस. टी. हे वाहन येत असे, खाजगी वाहनांचा प्रश्नच नव्हता. त्या मुळे मुलाला घरी शिकवणे हा एकाच मार्ग त्यांच्या कडे होता. या एका कारणाने मॅडम च्या मनात आले कि या ग्रामीण भागासाठी मतिमंद मुलांसाठी शाळा का सुरु करू नये. सौ. केंजळे मॅडम यांनी त्यांच्या लेखात सांगितले आहे.

       १९८४ सली सुरू झाली मतिमंद मुलाची निवासी शाळा. ठिकाण राहते घर त्या वर्षी पाच विद्यार्थी यांनी प्रवेश केला पण घर गावात असल्याने शेजारी व गावातील परिवार यांना त्रास होणार ! कारण मुले मतिमंद..! त्याना संभाळने .. त्यांचा गोंधळ..!  कोणाला त्रास होऊ नये या कारणाने. जवळच्या माळावर शाळा स्थलांतरित करावी असे ठरवले आणि जागा शोधून शाळा तिकडे हलवली जागा जिथे मिळाली तेथे जवळपास कोणी नाही मोकळे रान जाण्यायेण्या साठी सरकारी पांधन ती ही पावसात पूर्ण बंद असे. असले तरी मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू करणे हे एकमेव ध्येय आलेल्या केंजळे परिवाराने जागा घेऊन शाळा सुरू झाली.   

        शाळा तर सुरू झाली एक खोली एक छोटे शेड. मुलांना सांभाळण्यासाठी गावच्या जवळील काही मंडळी. अधिकचे विद्यार्थी ही प्रवेशासाठी येत होते. कोणाला नाही कसे म्हणावे हा प्रश्न मॅडम ला नक्की पडला असेल त्या आर्थिक बाजू आणि हे मोठे होत असलेले कुटुंब  सगळे सांभाळणे अवघड होत होते कारण आणि उत्पन्नाचे साधन म्हणजे केंजळे सरां ची नोकरी त्यावर तर सगळे चाले पण विद्यार्थी मतिमंद आणि रहिवाशी शाळा त्यामुळे जबाबदारी मोठी होती. त्या कारणाने सरांनी नोकरी सोडून पूर्ण लक्ष शाळेत घातले पण मॅडम शाळेचे सर्व पाहत असल्याने सरांनी शाळेसाठी परवानगी आणि निधी मिळवणे ही जबाबदारी स्वीकारली. मुलांकडे लक्ष देणे आणि त्यांना शिकवणे हे कार्य अखंड पणे दोन्ही उभयतांनी स्वीकारली.

       मतिमंद मुले असल्याने शाळा सोडून रात्री आपरात्री पळून जात त्या मुळे रात्र-रात्र धावपळ करून मुलांना शोधणे आणि शाळेत असणाऱ्या मुलांना राखून ठेवणे हे काम निरंतर चाले मुलाची सर्व जबाबदारी शाळेवर असल्याने त्याची भीती होती. कधी मुले आजारी पडली तर त्यांना डॉक्टर कडे घेऊन जाणे हे अवघड काम होते. कारण गावापासून दूर असलेली शाळा. मुलांना उचलून घेऊन जाणे एवढा एकच पर्याय असे आणि तोच स्वीकारून चालत जाऊन उपचार करत असे. त्यामुळे ठरून एक दोनचाकी वाहन घेतले कारण दुसरा काही पर्याय नव्हता. कारण प्रवासासाठी दुसरी काही व्यवस्था ही नव्हती आणि  साधने ही कमी होती. डॉक्टर ही सहकार्य करत असे आणि मुलांना समजून घेत आणि त्यांची फी देखील घेत नसे हे त्यांचे मोठेपण म्हणावे लागेल.

         दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत काही पालक मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी येत नसे हे पाहून वाईट वाटे मुलंही एकटी पडे हे प्रसंग येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत असे पण पालकांनी कधी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलेच नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.

       एकदा तर पावसामुळे ज्या ठिकाणी मुले राहत त्या हॉल ची व आम्ही राहत होतो त्या घरावरची वाऱ्याच्या हवेने पत्रे उडून गेले. त्यात मोठा पाऊस, भयाण रात्र आणि आम्ही सर्व त्या रात्री अखंड भिजत, उभे राहून रात्र काढली मुले रडत होती त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे पावसाच्या पाण्यात वाहत होती… मला असे वाटते की त्या रात्री पावसाचे पाणी ही खारट झाले असेल.! असे मॅडम यांनी सांगितले.

त्यांच्या जीवन प्रवास मतिमंद मुलांच्या आयुष्याशी खर्ची केला आणि एक समाज उभा करण्यासाठी अपार कष्ट केले. पंचाकृशितील नागरिकांना सोडून हे कदाचित कोणाला माहीत नसेल कारण त्यांनी कधी या गोष्टीचा बाऊ केला नाही किव्हा जाहिरात केली नाही कारण निस्वार्थी सेवा हा त्यांचा पाया आहे आणि होता…..

लेखक
मोहन गोळे

प्रादेशिक, हिंदी,राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील वृत्तवपत्र, टेलिव्हिजन चॅनेल आणि फक्त न्यूज पोर्टल यांच्या 60 वेबसाईटचे युआरएल अर्थात नाव आणि डोमेन नेम लिहा.

मराठी विभाग

वृत्तपत्र

  1. http://www.lokmat.com
  2. https://www.loksatta.com
  3. https://www.esakal.com
  4. https://maharashtratimes.indiatimes.com
  5. https://divyamarathi.bhaskar.com
  6. http://www.pudhari.news
  7. http://www.saamana.com
  8. http://www.tarunbharat.com
  9. http://www.epunyanagari.com
  10. http://deshonnati.digitaledition.in

टेलिव्हिजन चॅनेल

  1.  https://abpmajha.abplive.in
  2. https://zeenews.india.com/marathi
  3. http://www.saamtv.com
  4. http://www.tv9.com/TV9_marathi.html
  5. https://lokmat.news18.com
  6. https://www.jaimaharashtranews.com
  7. http://www.ddsahyadri.in

वेब पोर्टल

  1. https://www.bbc.com/marathi

BBC मराठी

थोडक्यात

सरकारनामा

महास्पोर्ट

द वायर मराठी

टाईम्स ऑफ इंडिया मराठी

हिंदी  विभाग

वृत्तपत्र

  1. https://www.jagran.com
  2. https://www.bhaskar.com
  3. https://www.amarujala.com
  4. https://www.livehindustan.com
  5. https://navbharattimes.indiatimes.com
  6. https://www.patrika.com
  7. https://www.jansatta.com
  8. https://www.punjabkesari.in
  9. http://epaperlokmat.in
  10. https://www.prabhatkhabar.com

टेलिव्हिजन चॅनेल

  1. https://aajtak.intoday.in
  2. https://zeenews.india.com
  3. https://khabar.ndtv.com
  4. https://hindi.indiatvnews.com
  5. https://abpnews.abplive.in
  6. https://ibn7.in
  7. https://www.news24.com
  8. https://www.itv.com/news/topic/india
  9. http://www.saharasamay.com
  10. http://ddnews.gov.in

वेब पोर्टल

  1. https://hindi.webdunia.com
  2. https://www.amarujala.com
  3. https://hindi.oneindia.com
  4. https://hindi.thequint.com/
  5. https://www.patrika.com
  6. https://www.india.gov.in
  7. https://www.bloombergquint.com
  8. https://www.thelallantop.com
  9. https://hindi.firstpost.com

English section

List of Indian newspapers

  1. https://timesofindia.indiatimes.com
  2. https://www.thehindu.com
  3. https://www.hindustantimes.com
  4. https://indianexpress.com
  5. https://www.dailypioneer.com
  6. https://www.deccanherald.com
  7. https://www.telegraphindia.com
  8. https://www.dnaindia.com
  9. https://www.deccanchronicle.com
  10. http://www.asianage.com

News channel

  1. https://zeenews.india.com
  2. https://www.ndtv.com
  3. https://www.newsx.com
  4. https://www.indiatoday.in
  5. https://www.news18.com
  6. https://www.ndtv.com
  7. https://aajtak.intoday.in
  8. https://www.republicworld.com
  9. https://www.timesnownews.com
  10. https://www.cnbc.com

Web Portal

  1. https://www.manoramaonline.com
  2. https://www.oneindia.com
  3. https://www.india.com
  4. https://www.moneycontrol.com
  5. http://www.fakingnews.com
  6. http://www.samachar.com
  7. https://in.reuters.com
  8. https://www.firstpost.com
  9. https://scroll.in
  10. https://www.mid-day.com

Most Popular Newspapers In The World 

  1. The Guardian (UK)

https://www.theguardian.com

  • The Wall Street Journal (USA)

https://buy.wsj.com

  • The New York Times (USA)

https://www.nytimes.com/

  • The Washington Post (USA)

https://www.washingtonpost.com

  • China Daily (China)

http://www.chinadaily.com.cn

  • The Times of India (India)

https://timesofindia.indiatimes.com

  • The Sydney Morning Herald (Australia)

https://www.smh.com.au/

  • The Asahi Shimbun (Japan)

http://www.asahi.com

  • Dawn (Pakistan)

https://www.dawn.com

  1.  Zaman(Turkey)

http://www.zaman.com.tr

News channel

  1. https://www.bbc.com
  2. https://www.foxnews.com
  3. https://edition.cnn.com
  4. https://news.sky.com
  5. https://www.msnbc.com
  6. https://www.aljazeera.com
  7. https://www.euronews.com
  8. https://english.alarabiya.net
  9. https://www.ndtv.com
  10. https://www.geo.tv

Web Portal

  1. https://news.google.com
  2. https://www.reddit.com
  3. https://www.bbc.com
  4. https://www.buzzfeed.com
  5. https://defence-blog.com
  6. https://www.e-ir.info
  7. http://www.globalissues.org
  8. https://www.thecipherbrief.com
  9. http://warnewsupdates.blogspot.com
  10. https://www.yahoo.com

सेमिस्टर – 2

विषय कोड – 205

असाईनमेंट नंबर – 1

नाव – मोहन तात्याबा गोळे

लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन नवमाध्यमांवर करताना कोणती काळजी घ्यावी? लोकसभा निवडणुकीची एखादी बातमी तयार करा.

निवडणूका होत असताना नवमाध्यमांतील उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. माध्यमे ही  प्रचार करणारी यंत्रणा म्हणून पुढे येत असल्याचे दिसून येते, त्यामुळे माध्यमांना विविध प्रकारचे दबाव येतात. माध्यमांवर विविध प्रकारच्या राजकीय समीकरणे  जुळवण्यासाठी जाहिराती प्रसारित करत असता. त्यामुळे माध्यमांना उत्पन्न मिळत आहे. असे असल्याने लोकसभा निवडणुकांमध्ये विशिष्ट पक्षाचा किंवा व्यक्तीचा अजेंडा राबवताना माध्यमे दिसतात आहे. असे असल्याने लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन करताना नैतिक मुल्यांचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे.
              

               ज्या प्रमाणे माध्यमे आत्तापर्यंत कामे करत होती त्याचप्रमाणे नवमाध्यमे ही लोकसभा निवडणुकीच्या काळात कामे करताना दिसत आहे.  बदलणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक व ऑनलाइन माध्यमातून वाचकांचे प्रमाण मोठे आहे, त्यामुळे नव माध्यमांना निवडणुकीच्या काळात विविध प्रकारची बंधने  व बातमीचे होणारा परिणाम हा लक्षात घेऊन बातमी द्यावी लागते किवा करावी लागते.

नवमाध्यमांना खालील प्रमाणे काळजी घ्यावी लागते.

१. बातमी हि निरपेक्ष असावी.

२. जाती – धर्म यांचा विचार करून बातमीची भूमिका असावी. सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

३. आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता बातमी असावी.

४. पक्षाच्या विचारणा किवा एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाला बळी न पडता बातमी असावी.

५. सत्य परिस्थिती दर्शवणारी  बातमी असावी.

६. ऐकीव माहितीवर बातमी नसावी, सत्यता पडताळून किवा प्रत्यक्ष झालेल्या घटनेवर बातमी असावी.

७. बातमीचे तथ्य जाणून घेऊन बातमी करावी.

८. आरोप-प्रत्यारोप ह्याची माहिती घेऊन बातमी असावी,खरच एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती वर आरोप केले आहेत का ह्याची तपासणी करून बातमी तयार करावी.

९. व्यक्ती किवा नेत्याच्या उमेदवाराच्या वैयक्तिक जीवनावर प्रभावित असणारी बातमी नसावी. खाजगी जीवनावर प्रभाव पडेल किवा चुकीची माहिती प्रसारित होईल ह्याची काळजी घ्यावी

१०. बातमी-दारी करताना नेता किवा उमेदवार त्याचा प्रचार करण्यासाठी बातमीचा उपयोग करून घेत आहेका याचा विचार करणे गरजेचे आहे.

११.आर्थिक देण्या-घेण्यावरून किवा प्रेम पोटी बातमी नसावी.

१२.बातमी मध्ये सर्वच आदर असावा उगाच कोणा व्यक्तीला किवा पक्षाला जुकते माप देऊ नये.

१३. बातमी मध्ये कोणाचा प्रचार नसावा किवा प्रपोगंडा चालू नये किवा बळी पडू नये.

१४. एखद्या उमेदवरचा उगाच वाहवाह नसावी किवा दैनदिन बाबीनाचा उहापोह टाळावा .

१५. बातमीची चव वाढावी म्हणून मिट-मिरची लाऊन बातमी नसावी जे असेन ते स्पष्ट आणि सोप्या भाषेत असावे.

१६. बातमी ही निरपेक्ष, निरव्याक्ती, निपक्षी व समजासाठी दिशा व सत्य व प्रामाणिक असावी.

ह्या प्रमाणे लोकसभेचे वार्तांकन करताना नवमाध्यमांनी काळजी घ्यावी.

बातमी
  

बारामती कोणाची ?

पिरंगुट ता. २९ : बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान २३ एप्रिल झाले,परंतु प्रचार इतकी चर्चा बारामती कोणाची या विषयाची झाली. कमी झालेले मतदान, जोरदार प्रचार, नेते व त्याच्या वल्गना या मुळे कोणाचा विजय होईल या विषयी उत्सुकता बारामती मतदार संघात आहे.

भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा प्रबळ उमेदवार दिल्याने मोठे आव्हान राष्ट्रवादी पुढे निर्माण झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी च्या उमेदवार या पूर्वी दोन वेळा प्रचंड मतांनी विजयी झाल्या होत्या. सन. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असून सुद्धा त्यांनी विजय संपादन केला होता. तसेच अजित पवार व  धनंजय मुंडे यांच्या मोठ्या सभा झाल्या व प्रत्यक्ष अजित पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना दूरध्वनी वरून संपर्क केल्याने कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून आले. तसा हा मतदार संघ शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. त्या मुळे येथील निवडणूक हि तेवढी प्रतिष्ठेची झाली.असे या वेळी दिसून आले.

भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा स्थानिक असणाऱ्या कांचन कुल यांना उमेदवारी दिली. या मतदार संघासाठी पक्षाच्या दिग्गज व्यक्ती यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली. मंत्री चंद्रकांत पाटील हे या मतदार संघात तळ ठोकून होते. संघ कार्यकर्त्यांनी १०० % प्रचारात सहभाग घेतला. तसेच नरेंद्र मोदी, अमित शहा, उद्धव ठाकरे व देवेन्द्र फडणवीस यांनी पुणे व  बारामती परिसरात मोठ्या सभा घेतल्या. याचा परिणाम हा मतावर होताना दिसला पक्षाचे कार्यकर्ते व संघ कार्यकर्ते १०० % मतदान होण्या साठी व त्या अनुषंगाने भाजपा चा प्रचार केला. परंतु मतदान हे कमी झाल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून आले.

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोर हे विधानसभा येतात या मध्ये पक्षाची ताकद हि बरोबरीची आहे असे जाणकारांचे मत आहे. बारामती, इंदापूर व भोर हे राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्या कडे आहे. खडकवासला, पुरंदर व दौंड भाजपा, शिवसेना व रसपा  यांच्या कडे आहे. त्या मुळे हि लढत तुल्यबळ आहे. त्याचा प्रमाणे भोरचे आमदार व इंदापूरचे मा.आमदार हे कॉंग्रेस चे असल्याने त्यांनी नक्की काय भूमिका घेतली ह्या विषयी गुड निर्माण झाल्याने लढती मध्ये कोण विजयी होईल हा प्रश्न दोनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतावतो आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा एक हि उमेदवार नसताना पुणे परिसरात राज ठाकरे यांनी मोदी व शहा यांच्या विरोधात घेतलेली सभा हि महत्वाची घटना मानली जाते. मनसे यांचे या मतदार संघात युवक संघटन व मतदार संख्या मोठी आहे. त्या मुळे राष्ट्रवादी ला जमेची बाजू झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

बारामती लोकसभा मतदार संघ हा नक्की कोणाकडे राहतो आहे हे येणाऱ्या २३ मे ला समजेन परंतु हि निवडणूक राष्ट्रवादी पक्षाला प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरली.


नवमाध्यमांवरील फिडबॅक म्हणजे काय? त्याचे महत्व सांगा, नवमाध्यमांचा पारंपरिक माध्यमांवर होणारा परिणाम सांगा. तसेच नवमाध्यमांचे भविष्य काय असेल हे थोडक्यांत लिहा. माध्यमांचा समाजमनावर होणारा परिणाम सांगा.

फिडबॅक म्हणजे माध्यमांद्वारे प्रसारीत होणाऱ्या बातमी बाबत वाचकांकडून प्रति उत्तर किंवा त्या बातमी बाबत चे मत किंवा प्रतिक्रिया म्हणजे फिडबॅक होय.

नवमाध्यमांना हे खऱ्या अर्थाने वाचक व माध्यमे यांच्यामध्ये संपर्काचा मोठा दुवा आहे.

पारंपारीक माध्यमांना फिडबॅक मिळवले हे अवघड होते समाज मनावर काय परिणाम होतो आहे ते समजणे पारंपारीक माध्यमांना शक्य होत नसल्याने वाचकांना नक्की कोणती बातमी हवी आहे त्यावर प्रतिक्रिया काय आहे हे समजत नसे त्यामुळे पारंपारीक माध्यमांमध्ये सर्व प्रकारच्या बातम्या वाचकांन पर्यंत पोचवाव्या लागत असे वाचकांची पसंती हे अधोरेखीत होतं नसे त्यामुळे नवमाध्यम हे वाचकांच्या प्रति अग्रगण्य भूमिका घेताना दिसत आहे.

नवमाध्यमां मध्ये फिडबॅक चा वापर होऊ लागल्याने वाचकाला आवडणारी बातमी व त्यावर त्याच्या प्रतिक्रिया हि त्वरीत मिळत असल्याचे दिसते आहे.यामुळे बातमी चे महत्व खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे.

दिवसेंदिवस नवनवीन एप्लिकेशन व पोर्टल व पारंपारीक माध्यमांचे नूतनीकरणकडे वाढलेला कल नवमाध्यमांतील नांदी म्हणावी लागेल, माध्यमांमुळे बातमीचा फिडबॅक मिळणे हे महत्व पूर्ण काम होत आहे. बातमी व तिचे काय परिणाम होतो हे समजण्यास मदत होत आहे. बातमीचे स्वरूप व स्पष्टीकरण वाचकांना आवडेल किंवा नाही आवडले हे त्वरीत माहित होऊ शकते याचा उपयोग वाचकांची आवड काय आहे हे समजते त्यानुसारच वाचकाला बातमी पाठवली जाऊ शकते.

पुढील प्रमाणे महत्व पूर्ण घटक सांगता येतील

1. फिडबॅक देणे घेणे सहज शक्य झाले वाचकांची पसंती समजणे सोपे झाले.
2. हि माध्यमे ऑनलाइन असल्याने फिडबॅक देणे-घेणे व कोणत्याही ठिकाणावरून सोपे शक्य झाले आहे.
3. वाचकाचा फिडबॅक माध्यमांना मोजता येतो त्यामुळे वाचकांची पसंती व टीकाटिपणी वाचकाला काय हवे काय नको हे समजते तसेच फिडबॅक मोजता येते त्यानुसार माध्यमांना काम करण्यास मदत होते.
4. फिडबॅक साठी खर्च खूप कमी प्रमाणात येतो ऑनलाइन पद्धतीमुळे एखादी लिंक किंवा एसएमएस चा वापर करून कमी खर्चात फीडबॅक देता येतो खर्च कमी असल्याने उपयुक्तता हि जास्त झाली आहे.

नवमाध्यमांचा पारंपारीक माध्यमांवर होणारा परिणाम खालील प्रमाणे सांगता येईल.

1. पारंपारीक माध्यमांवरील वाचकांच्या संख्येत घट निर्माण झाली आहे वाचक हे नावमाध्यमांकडे वळल्याने वाचक कमी होत आहे.
2. आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. काही प्रमाणात पारंपारिक माध्यमे म्हणजे पेपर मीडिया त्यावर मोठा परिणाम होत आहे. वाचक नवमाध्यमांचा वापर करत असल्याने पारंपारिक माध्यमांकडे दुर्लक्षित झाला आहे. त्यामुळे आर्थिक प्रश्न पारंपारिक माध्यमांकडे वाढत आहे.
3. पारंपारिक माध्यमाद्वारे ठराविक वेळेत बातम्या ऐकणे किंवा वाचायला मिळणे हे होत होते. परंतु वाचकाला बातमी कोठेही, कधीही कोणत्याही वेळात वाचायला मिळते त्यामुळे पारंपारिक माध्यमांचा वापर कमी झाला आहे.
4. पारंपारीक माध्यमांवर ही बदलाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपारीक माध्यमे ऑनलाइन पोर्टलवर येत आहे. त्यामुळे वाचकांना पारंपारीक माध्यम वरील लेख वाचायला मिळताना दिसत आहे.

नवा माध्यमांचे भविष्य पुढीलप्रमाणे मांडता येईल.

1. इलेक्ट्रॉनिक माध्यमे व ऑनलाइन पोर्टल यांची व्यवस्थितपणे सांगड झाल्याने नवमाध्यमांतील मोठ्या प्रमाणामध्ये उदय झाला. त्यामुळे वाचकांची संख्या हे वाढत झाली आहे.
2. विविध प्रकारच्या बातम्या कमीतकमी वेळात पोचवण्याचे काम नवमाध्यमे करत आहे. वाचकाला त्वरीत बातमी मिळते त्यामुळे नवमाध्यमांतीचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे.
3. बातमीची सत्यता अधोरेखीत होत नाही त्यामुळे गैरसमज, गैरप्रकार होण्यास चालना मिळते आहे. या मुळे नवमाध्यमांना विश्वासार्हता संपादन करणे गरजेचे आहे.
4. नवमाध्यमांतीचा वाचक वाढत असलेले आर्थिक गणितही मोठ्या प्रमाणात होत आहे. या मुळे आर्थिक उन्नती होण्यास मदत होत आहे.

5. मोबाईल फोन चा वापर ज्यास्त होत आहे व हे प्रमाण अधिक वाढत जात आहे त्या मुळे नवमाध्यमांचा वाचक वाढणारे असून त्याचा फायदा नवमाध्यमांना होणार असल्याचे दिसून येत.

समाजमनावर होणारे परिणाम पुढील प्रमाणे सांगता येतील.

1.तत्काळ कोणतीही शहानिशा न करता बातमी प्रसारीत केल्याने तेढ निर्माण होत आहे.

2.विश्वासार्हता कमी.

3.समाजामध्ये दुर्वीकरण होण्यास मदत.

4.सत्यता न जाणता चुकीच्या माहिती वरून बातम्या प्रसारीत केल्या जातात त्यामुळे सत्या पासून वाचक दूर जाताना दिसत आहे.

5.आर्थिक व सामाजिकदृष्ट्या प्रगतीसाठी विशिष्ट प्रपोगंडा तयार करून वाचकांवरती त्याचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे.

6.विविध चित्रे व्हिडिओ द्वारे चुकीचे संदेश प्रसारीत होत असल्याने सामाजिकदृष्ट्या सलोका बिघडल्याचे दिसत आहे.

7.नवमाध्यमांचा वापर चुकीची माहिती प्रसारीत करुन एखाद्या विशिष्ट व्यक्तीला समाजामध्ये चांगली, योग्य असल्याचे भासवण्यासीठी वापरले जाते आहे.

8.नवमाध्यमांतीने माहिती चुकीची पसरवली असता त्याचा परिणाम समाज मनावर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये व जलदगती होत आहे. अश्या माहितीमुळे वाचकांची मते टोकाची झाल्याचे दिसत आहे.

9.नवमाध्यमाध्वारे माहिती वाचकाला सत्य वाटते व त्या वरून त्याचे मते तयार करत असतो त्यामुळे कोणतीही बातमी व तिची सत्यता पडताळणी अवघडच झाले आहे. चुकीच्या माहिती वरून वाचकांचे मते तयार झाल्यास त्याचा समाजावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे नवमाध्यमांन वर विश्वास ठेवावा का हा प्रश्न निर्माण होतो.

  • सेमेस्टर 2
  • असाइनमेंट नंबर 4
  • मोहन तात्याबा गोळे